#पक्षांतर : शहा आणि गोयल यांची अनुमती मिळाली केवळ फडणवीसांचा होकार बाकी : नारायण राणे

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करत आहेत. खासकरून हे पक्षांतर शिवसेना भाजपमध्ये मोठ्या परमावर होत आहे. या पक्षांतराच्या गंगेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे देखील हात धुवणार असल्याचं दिसत आहे. कारण राणे यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत. एबीपी माझाच्या एका विशेष कार्यक्रमात मुलाखतीवेळी राणे यांनी याबाबतचे सूचक विधान केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मला भाजपात येण्या साठी अनुमती दिली आहे. केवळ आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अनुमती बाकी आहे. ती एकदा मिळाली की भाजपात जाणार असल्याचं नारायण राणे यांनी सांगितले आहे. पत्रकारांनी आपण भाजपात केव्हा जाणार असे नारायण राणेंना विचारले होते. यावेळी नारयण राणेंनी सूचक विधान केले.

दरम्यान राणे यांनी ‘मी भाजपमध्ये राहणार की माझ्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात राहणार हे येत्या दहा दिवसात स्पष्ट होईल. भाजपने दिलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तता केलेली नाही. येत्या चार पाच दिवसात मुख्यमंत्री याबाबत निर्णय कळवणार आहेत, त्यानंतर मी माझा निर्णय जाहीर करणार आहे, असं नारायण राणेंनी सांगितले आहे.