‘शाहरुख क्रूझ ड्रग्स प्रकरणी निशाण्यावर असू शकतो’; शत्रुघ्न सिन्हांचे मोठं वक्तव्य

मुंबई :  बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (NCB) चौकशी करण्यात आली. आर्यन खानला अटक झाल्याने बॉलिवूडमध्ये सध्या खळबळ माजली असून अनेक सेलिब्रिटी शाहरुख खानला पाठिंबा देत आहेत. मात्र अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांनी शाहरुख खान मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी निशाण्यावर असू शकतो अशी शंका उपस्थित केली आहे.

बॉलिवूडमध्ये ड्रग्जचा ट्रेंड वाढतोय का? असे विचारण्यात आल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की,  छोट्या स्तरावर अशा गोष्टी घडत असतील पण ते जेवढ्या प्रमाणात सांगितलं जात आहे, तेवढं तरी नक्कीच नाही. मुद्रा बंदरावर मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत, त्या प्रकरणापासून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी हे प्रकरण उगाच मोठे केले जात असल्याची चर्चा असल्याचंही ते एका मुलाखतीदरम्यान म्हणाले.

पुढे ते म्हणाले, ‘मला वाटतंय की यामागे एक षड्यंत्र आहे. हे प्रकरण सध्या विचाराधीन असल्याने मी त्याबद्दल जास्त काही बोलणार नाही. आर्यनकडून ड्रग्स जप्त करण्यात आलेले नाहीत. त्याची रक्त तपासणी करण्यात आलेली नाही. या कथित अटकेमध्ये काही पक्षांचे लोकही सहभागी होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलेले आरोप लक्षात घेण्यासारखे आहेत. त्यांचे सर्व आरोप कदाचित खरे नसतील पण तपास झाला पाहिजे,” असंही शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. त्याच्या विधानमुळे खळबळ उडाली असून याप्रकरणी नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांचा तपास केला जावा असेही मत व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या