‘शाहरुख खानने मलिक आणि राऊतांना रोज उठून कुत्र्यासारखं भुंकण्यासाठी भाड्याने घेतलं असेल’

‘शाहरुख खानने मलिक आणि राऊतांना रोज उठून कुत्र्यासारखं भुंकण्यासाठी भाड्याने घेतलं असेल’

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या एनसीबीने केलेल्या कारवाईनंतर पोलीस कोठडीत आहे. त्याच्या अटकेवर, एनसीबीच्या छाप्यावर संशय घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही कारवाई करण्यामागे राजकीय सूडबुद्धीने घेत असल्याचं म्हंटल आहे. महाविकास आघाडीने आर्यन खानला दिलेल्या पाठिंब्यावरुन विरोधी पक्ष भाजपने महाविकास आघाडीवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. भाजपचे आमदार नितेश राणेंनी नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्यावर तिखट शब्दात टीका केली आहे.

संजय राऊत आणि नवाब मलिक यांना शाहरुख खानने कॉन्ट्रॅक्टवर घेतलं असेल. शाहरुख खानने मलिक आणि राऊत रोज उठून कुत्र्यासारखं भुंकण्यासाठी 6 महिन्यांसाठी भाड्याने घेतलं असेल. रोज कुत्र्यासारखं भुंकण्याची जबाबदारी त्यांना दिली असेल. म्हणून पगारावर चालणाऱ्या लोकांसारखे चालतात, अशा तिखट शब्दात नितेश राणेंनी नवाब मलिक आणि संजय राऊतांवर टीका केली आहे.

संजय राऊत हल्ली कुठल्या प्रतीचा गांजा घेतात हे विचारा. कारण दिवसेंदिवस ते नशेतच दिसतात. म्हणून त्यांच्यावर कमी बोलणं बरं. गांजाडी लोकांवर किती बोललं पाहिजे हे आता आम्ही लोकप्रतिनिधींनी ठरवलं पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

आर्यन खानसाठी जेवढं नवाब मलिक बोलतात. महाविकास आघाडीतील नेते बोलतात मग तेवढंच आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी का बोलत नाहीत. तेवढंच पीक विमा कंपन्यांच्या विरोधात का बोलत नाहीत? आर्यन खान आहे म्हणून बोलतात. सुशांत सिंह राजपूतसाठी का बोलले नाहीत? तो हिंदू होता म्हणून? या सर्व गोष्टी एकाच दिशेने सुरु आहेत. तो खान आहे म्हणून एवढं प्रेम दाखवतात. सामान्य तरुण तरुणींवर का प्रेम दाखवत नाही?, असा सवालही नितेश राणेंनी विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या