Share

Kiff 2022 | शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांचा ‘हा’ हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

Kiff 2022 | कोलकत्ता: सध्या बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांची क्रेझ आहे. अशा परिस्थितीत बरेच सेलिब्रिटी वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांना हजेरी लावताना दिसत आहे. अशात बॉलीवूड मधील दिग्गज अभिनेते शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) कोलकत्ता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (Kiff) दिसले आहे. कोलकत्ता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 15 डिसेंबर पासून सुरू झाला आहे. बॉलीवूडमधील बिग बी आणि किंग खान या दोघांनी 28 व्या कोलकत्ता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली.

शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांनी चित्रपट सृष्टीला एका पेक्षा एक उत्कृष्ट चित्रपट दिले आहे. हे दोन्ही अभिनेते कित्येक वर्षापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. नुकतेच हे दोघे कोलकत्ता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये एकत्र दिसले आहेत. या पुरस्कार सोहळ्यामध्ये या दोघांव्यतिरिक्त राणी मुखर्जी, अरिजीत सिंग, जया बच्चन इत्यादी मान्यवर मंडळी हजर होती.

कोलकत्ता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर शाहरुख खानने बंगाली भाषेमध्ये आपल्या भावना व्यक्त केले. दरम्यान, या कार्यक्रमामध्ये त्याचा सत्कार करण्यात आला. सत्कार झाल्यानंतर शाहरुख खानने अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा पाया पडून आशीर्वाद घेतला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शाहरुख खान जया बच्चन, आणि अमिताभ बच्चन ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटांमध्ये एकत्र दिसले होते. या चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी शाहरुख खानच्या आई वडिलांची भूमिका निभावली होती.

त्याचबरोबर या चित्रपट महोत्सवामध्ये अभिनेते शत्रुघ्न सिन्हा देखील उपस्थित होते. त्यांनी शाहरुख खानला देशाचा हिरो म्हणून संबोधले आहे. तर, या महोत्सवास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील उपस्थित होते. हा महोत्सव 22 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या

Kiff 2022 | कोलकत्ता: सध्या बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांची क्रेझ आहे. अशा परिस्थितीत बरेच सेलिब्रिटी वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांना हजेरी लावताना …

पुढे वाचा

Entertainment

Join WhatsApp

Join Now