विधानसभा निवडणुकीसाठी शहांनी बोलावली बैठक, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथे भाजप मुख्यालयात बैठक सुरू आहे. या बैठकीत महाराष्ट्रात भाजप निवडणुकांना कशा पद्धतीने सामोरी जाणार याची रणनीती आखली जात आहे. तसेच भाजप-शिवसेना युतीबाबत देखील या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. युतीच्या जागावाटप कशापद्धतीने होणार यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

दिल्लीच्या भाजप मुख्यालयात देखील गृहमंत्री अमित शहा यांनी बैठकी बोलावली आहे. महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे, महाराष्ट्र निवडणूक प्रभारी भुपेंद्र यादव, तसेच हरियाणा आणि झारखंड राज्यातील निवडणूक प्रभारी बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका या मुख्यमंत्र्यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या जाणार आसल्याचा निर्णय खुद्द अमित शहा यांनी घेतला आहे. भाजपने विधानसभा निवडणुकांसाठी 3 राज्यांमध्ये आपली कंबर कसली आहे. यासाठी दिल्लीमध्ये भाजपच्या मुख्यालयात आज बैठक पार पडली. यामध्ये हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान काही दिवसातचं राज्यात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. तर भाजपने आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व खाली महाजानादेश यात्रा काढली आहे. त्यामुळे अमित शहांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीचं निवडणूक पार पडणार असल्याची घोषणा केली आहे.