पर्रीकर ब्लॅकमेल करु शकतात म्हणून त्यांचा राजीनामा घेतला जात नाही; कॉंग्रेसचा गंभीर आरोप

amit shah and pm narendra modi

टीम महाराष्ट्र देशा- राफेल विमान खरेदी कराराबद्दल पर्रीकर यांच्याकडे अतिशय महत्त्वाची माहिती आहे. या माहितीच्या आधारे ते ब्लॅकमेल करु शकतात, अशी भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना वाटते. त्यामुळेच त्यांच्याकडून पर्रीकरांचा राजीनामा घेतला जात नाही, असा गंभीर आणि खळबळजनक आरोप गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे काही दिवसांपासून गोव्यात नेतृत्त्व बदलाची चर्चा होती. मात्र काल अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला. पर्रीकरच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील, असं भाजपाकडून जाहीर करण्यात आलं. यानंतर काँग्रेसचा तिळपापड झाला आणि नेते गिरीश चोडणकर यांनी हे गंभीर आरोप केले आहेत.

नेमकं काय म्हणाले गिरीश चोडणकर ?
राफेल डीलबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती बाहेर येऊ नये, यामुळेच मनोहर पर्रीकरांना मुख्यमंत्रीपदी कायम ठेवण्याचा निर्णय भाजपा नेतृत्त्वानं घेतला आहे. ज्यावेळी राफेल विमान खरेदीचा करार झाला, त्यावेळी मनोहर पर्रीकर संरक्षण मंत्रीपदी होते. त्यामुळे त्यांच्याकडे या कराराबद्दलची महत्त्वाची माहिती आहे, असं मला वाटतं. या माहितीच्या आधारे त्यांच्याकडून ब्लॅकमेलिंग केलं जाऊ शकतं. त्यामुळेच मोदी-शहा त्यांना राजीनामा द्या, असं सांगण्याची हिंमत दाखवू शकत नाहीत.

नौदलात जे शौर्य आहे, ते तुमच्या ५६ इंच छातीत नाही : उद्धव ठाकरे