पाकिस्तानी क्रिकेटर मला ब्लॅकमेल करतोय, महिलेची इन्टाग्राम पोस्ट व्हायरल

blank

नवी दिल्ली : पाकिस्तानी क्रिकेटर नेहमीच मैदानातील आणि मैदानाबाहेरील कुरापतीमुळे अनेकदा चर्चेत असतात. पाकिस्तानचा फिरकीपटू शादाब खान याच्यावर एका महिलेने चक्क ब्लॅकमेलिंगचा आरोप केलाय. या आरोपांमुळे क्रिकेटच्या दुनियेत या पाकिस्तानी खेळाडूमुळे खळबळ उडाली आहे.

दुबईमध्ये वास्तव्यास असलेल्या अशरीना साफिया या महिलेने शादाब खान याच्यावर ब्लॅकमेलिंगचा आरोप केलाय. शादाब खान ब्लॅकमेल करत असल्याची एक पोस्टच तिने इन्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केली आहे. एका पाकिस्तानी पत्रकाराने शादाबसोबत माझा फोटो काढला होता. तो फोटो पत्रकाराकडून व्हायरल करण्यात आला. तेव्हापासून शादाब मला ब्लॅकमेल करत असल्याचा दावा अशरीना साफिया हिने केलाय.

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दोघांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर आपल्या नात्याविषयी कोणाला काही सांगू नको, असे शादाबने म्हटले होते. जर कोणाला काही बोललीस तर खासगी फोटो व्हायरल करेन अशी धमकी शादाबने दिली. कोणीही तुला माझ्याबद्दल काही विचारले तर तू फक्त माझी चाहती आहेस असेच सांगायचे, असे पाक क्रिकेटरने बाजावले आहे, असा आरोप साफियाने केला आहे.