शबरीमालाची पुढील सुनावणी ७ न्यायाधींच्या खंडपीठाकडे

blank

टीम महाराष्ट्र देशा : सर्वोच्च न्यायालयाने शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांच्या प्रवेशासंदर्भात दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवर  सुनावणी घेतली. त्यानंतर हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पुढील सुनावणीसाठी पाठविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा निर्णय 3-2 बहुमताने घेण्यात आला. आता या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे ७ न्यायाधीशांचे मोठे खंडपीठ सुनावणी घेईल.

सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की एससीचे निर्णय सर्वांसाठी बंधनकारक आहेत आणि २०१८ चा निकाल अखंड राहील. शबरीमाला प्रकरणात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने फेब्रुवारी महिन्यात ही चर्चा पूर्ण केली. केरळमधील शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील स्त्रीयांना प्रवेशास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली होती.

या निर्णयाला अनेक धार्मिक संघटनांनी विरोध केला होता. हे परंपरांचे उल्लंघन असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या या निर्णयावर पुनर्विचार करावा यासाठी फेरविचार याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या :