… म्हणून शबाना आजमी यांना मागावी लागली भारतीय रेल्वेची माफी

नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आजमी यांच्यावर एक व्हिडीओ ट्विटरला पोस्ट केल्याप्रकरणी भारतीय रेल्वेची माफी मागण्याची वेळ आलीये शबाना आजमी यांनी ट्विटरला एक व्हिडीओ पोस्ट केला होता ज्यामध्ये कर्मचारी घाणेरड्या पाण्यात प्लेट्स धुत होते. हे कर्मचारी भारतीय रेल्वेचे आहेत असं समजत शबाना आजमी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनाही तो व्हिडीओ टॅग केला.

होता मात्र त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच त्यांची चूक शबाना आजमी यांच्या लक्षात आणून देण्यात आली. मॅडम हा व्हिडीओ मलेशिअन रेस्टॉरंटमधील असल्याचं रेल्वे मंत्रालायने ट्विटरला रिप्लाय देत सांगितलं. यावेळी त्यांनी एक बातमीची लिंकही सोबत दिली. यानंतर लगेचच आपली चूक लक्षात येताच शबाना आजमी यांनी माफी मागितली.मात्र तोपर्यंत त्या चांगल्याच ट्रॉल झाल्या होत्या.