वारकरी शिक्षण संस्थेतील नराधम शिक्षकाने केला शिष्यावर लैंगिक अत्याचार

पैठणच्या वारकरी शिक्षण संस्थेत गुरु-शिष्य नात्याला काळिमा ; चोप देताच महाराजाने ठोकली धूम

पैठण : शांतिब्रम्ह श्री संत एकनाथ महाराज यांच्या पावन भूमीतील वाघाडी येथील माजी खासदार रामकृष्ण पाटील यांच्या नाथफार्मच्या ठिकाणी असलेल्या रामेश्वर वारकरी शिक्षण संस्थेच्या शिक्षक महाराजाने याठिकाणी शिक्षण घेणाऱ्या एका अकरा वर्षीय बालकावर लैगिंक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असुन या घटनेमुळे संतप्त झालेल्या पालकांनी त्या नराधमाला चांगलाच चोप दिला मात्र स्थानिक पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यपूर्वक न हाताळल्यामूळेच आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती नुसार पैठण तालुक्यातील वाघाडी शिवारातील माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांच्या नाथफार्म हाऊस याठिकाणी रामेश्वर भगवान वारकरी या नावाने शिक्षण संस्था आहे याठिकाणी शेजारच्या जिल्ह्यातील जवळपास 17 बालके वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेत आहेत .रविवारी शाळेला सुट्टी असल्याने संस्थेत सर्व मुले खेळत असतांना या ठिकाणी शिकवणाऱ्या शिक्षक महाराज गणेश लक्ष्मणराव तौर वय 40 रा. गोपत पिंपळगाव (ता गेवराई जिल्हा बीड) याने पाचवीत शिक्षण घेणाऱ्या एका अकरा वर्षीय बालकाला अंग दाबण्यासाठी बोलावले व रूमचा दरवाजा लावत त्या बालकावर लैगिंग अत्याचार सुरू केला. यात पीडित मुलाने आरडा ओरड केली असता इतर मुलांनी खिडकीतून डोकावले असता महाराज त्या मुलासोबत लैगिंग अत्याचार करत असतांना निर्दशनास आले यावर मुलांनी सदर घटना पालकांना बोलून दाखवली. आज पीडित मुलाच्या पालकांनी पोलीस स्टेशन गाठले. तत्पूर्वी या रंगेल महाराजाला जमावाने घटनास्थळी व सरकारी दवाखाना परिसरात बेदम मारहाण केली.

चोप देताच महाराजाने ठोकली धूम

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावातील नागरिकांनी ही संस्था गाठली. त्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी तौर महाराजाला चांगला चोप दिला, मात्र उपचारासाठी महाराजाला सरकारी दवाखान्यात नेले असता तेथूनच त्याने धूम ठोकली. वारकरी संप्रदायाला बदनाम करणाऱ्या या महाराजाच्या विरोधात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

या प्रकारात राजकीय बदनामी होऊ नये म्हणून एका मोठ्या राजकीय नेत्यांच्या इशाऱ्यावर हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला.मात्र पिडीताच्या नातेवाईकांनी हा राजकीय दबावापुढे न झुकता आरोपीविरूद्ध गून्हा दाखल करण्याची ठाम भूमिका घेतली. या प्रकाराने तालुक्यात खळबळ माजली असून गुरू शिष्य नात्याला काळिमा फासणाऱ्या नराधम शिक्षक महाराजावर सायंकाळी उशिरा पिडीत मुलाचे वडील अंकुश गोविंद ढेरे ( रा. भोगगाव ता. घनसावंगी जि. जालना ) यांच्या फिर्यादीवरून पैठण पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक भास्कर सोनवणे यांनी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विलास दूशिंगे हे करीत आहेत.

स्थानिक पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यपूर्वक न हाताळल्यामूळेच आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे. पिडीत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांकडून पोलिसांवर संशय व्यक्त केला गेला आहे. विशेष म्हणजे तीन दिवसापूर्वीच शहरातील एका काॅलेज मधील विद्यार्थ्यांनीचा दुसऱ्या  हायस्कूल मधील विद्यार्थ्यांने विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाच शिक्षकानेच विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक कृत्य केल्याचे प्रकरण चव्हाटय़ावर आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. दोन्ही प्रकरणातील आरोपी फरार झाल्याने स्थानिक पोलिसांबद्दलही संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.