पाच पाद्रींंनी मिळून केले चर्चमध्ये विवाहितेचे लैंगिक शोषण

Gang-rape

टीम महाराष्ट्र देशा – केरळमधील कोट्टयम शहरातील एका चर्चमधील पाच पाद्रींवर विवाहित महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी चर्च व्यवस्थापनाने चौकशी समिती नेमली असून चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत पाचही पाद्रींना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. महिलेच्या पतीने यासंदर्भात चर्चमधील वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. विवाहितेच्या पतीने चर्चच्या वरिष्ठांना पत्र पाठवून पत्नीवरील अत्याचाराची माहिती दिली.

नेमकं काय आहे प्रकरण ?

चर्चमधील कन्फेशन खोलीत एखाद्याने चुकीची कबुली दिल्यानंतर ते गोपनीय ठेवणे बंधनकारक असते. मात्र, पाद्रींनी याचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. महिलेने तिच्या प्रेमसंबंधाची कबुली दिल्यानंतर या नराधम पाद्रींनी या आधारे तिला ब्लॅकमेल केले. विशेष म्हणजे यातील एका पाद्रीने तिचे लग्नापूर्वी लैंगिक शोषण केले होते. महिलेने हा प्रकार कन्फेशन खोलीत सांगितला होता. कन्फेशन खोलीतील पाद्रीने हा प्रकार ऐकताच त्याने देखील महिलेला ब्लॅकमेल केले आणि तिचे शोषण केले. विवाहितेचे अश्लिल फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देखील त्या पाद्रींनी दिल्याचा आरोप विवाहितेच्या पतीने केला आहे.

दरम्यान,यासंदर्भात चौकशी समिती नेमण्यात आली आहे. सर्व पाद्रींना तुर्तास सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. या कालावधीत त्यांनी चर्चच्या कामकाजात सहभागी होऊ नये, असे आदेशही देण्यात आले आहेत.