पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, अल्पवयीन मुलीसह दोघींची सुटका

टीम महाराष्ट्र देशा- शहरातील शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन परिसरात चालणा-या सेक्स रॅकेटचा सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला असून पोलिसांनी यावेळी एका अल्पवयीन मुलीसह दोघींची सुटका केली आहे. याप्रकरणी बिजना बन्या तामचीकार (वय-50, रा.भाटनगर बिल्डींग, पिंपरी, पुणे) या महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालीस हवालदार नितिन तरटे यांनी शिवाजीनगर आणि रेल्वे स्टेशन परिसरात वेशाव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी बनावट गि-हाईक पाठवले असता आरोपी महिला पैसे घेऊन अल्पवयीन मुलीला सदर गि-हाईकाच्या ताब्यात देताना छापा टाकला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे