मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन जण ताब्यात

sex-racket-

मुंबई : चित्रपटांमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणींकडून देहव्यापार करुन घेणाऱ्या टोळीचा बांगूर पोलिसांनी पर्दाफाश केला. सामाजिक कार्यकर्ते अमित जलान यांना या सेक्स रॅकेटची माहिती मिळताच त्यांनी मुंबई पोलिसांना ही माहिती कळवली. माहितीच्या आधारे मालाडमधील बांगूर पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत दोन जणांना ताब्यात घेतले आहे. तर दोन अल्पवयीन मुलींसह एकूण पाच मुलींची सुटका केली आहे. या प्रकरणात मालाडच्या बांगूर नगर पोलीस ठाण्यात पोस्को आणि पिटा कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या एका मुलाचे नाव महुल वाघेला असून तो टीव्ही मालिकांमध्ये लहान-मोठ्या भूमिका करतो.