‘मी मर्द आहे. नपुंसक नाही. जे काही करायचं असेल तर छातीठोक करेन’-हार्दिक पटेल

hardik patel

टीम महाराष्ट्र देशा : कथित सेक्स सीडी समोर आल्याने वादात सापडलेला पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने विरोधकांचा जोरदार समाचार घेतला आहे. . ‘मी मर्द आहे. नपुंसक नाही. जे काही करायचं असेल तर छातीठोक करेन, असा सणसणीत टोला हार्दिकने लावला आहे.

‘ही सेक्स सीडी बनावट आहे. भाजपच्या घाणेरड्या राजकारणाचा हा भाग आहे. भाजपनं माझ्या खासगी आयुष्यावरच हल्ला केला आहे. ‘असले’ उद्योग करणारे भाजपमध्ये अनेक लोक आहेत. मी सुद्धा लवकरच त्यांची पोलखोल करणार आहे,’ असा इशारा सुद्धा हार्दिक पटेल याने दिला आहे.