शेवगाव ते खामगाव या रस्त्याच्या कामाची चौकशी करावी !

शेवगाव / रवी उगलमुगले: शेवगांव ते खामगाव या राज्य महामार्गावर झालेल्या डांबरीकरण व साईडपट्ट्याचे काम अतिशय निर्कष्ट दर्जाचे झालेले आहे. यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. काही नागरिकांना तर आपला जीवही गमवावा लागला आहे.

Loading...

जोहरापुर ग्रामपंचायत सदस्य व भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस शिवाजी खेडकर यांनी याबाबत तालुका उपअभियंता सार्वजनिक बांधकाम शेवगाव, यांना निवेदन देताना म्हटले आहे की, या रस्त्याचे काम १७ डिसेंबर २०१६ पासून चालू आहे. सदरचे काम हे अतिशय खराब दर्जाचे काम आहे. हे काम ताबडतोब थांबवण्यात यावे यासाठी मी त्यावेळी निवेदन दिले होते, पण त्यावेळी अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही.

यावरून असं स्पष्ट होत की अधिकारी व ठेकेदार यांच्यामध्ये अर्थपूर्ण तडजोड झाली आहे.
काम होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. या एका वर्षाच्या कालावधीत हा शेवगाव खामगाव रोड पूर्णपणे उघडून गेला आहे. याला जबाबदार असणाऱ्या ठेकेदारावर ताबडतोब कारवाई करण्यात यावी व त्यांनी दिलेल्या हमीपत्राप्रमाणे या रोडच्या उखडलेल्या रोडचे कामही त्यांच्याकडून करून घेण्यात यावे. जनतेचा जो पैसा खर्च झालेला आहे त्याची भरपाई संबंधित ठेकेदारांकडून करण्यात यावी. तसेच अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर कायदेशीर रित्या कारवाई करण्यात यावी. असेही निवेदनात म्हटले आहे.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...