fbpx

आंतरराष्ट्रीय शाळांसाठी सरसावले सातशे शिक्षक

पुणे : आदिवासी, दुर्गम व डोंगराळ तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणे, शहरी भागातील झोपडपट्टीतील मुलांचे शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे करणे, अन्य इंग्रजी माध्यमाच्या शाळांप्रमाणे शैक्षणिक दर्जा उंचावणे आदी आव्हाने शिक्षण विभागाने दिल्यानंतर राज्यभरातील शिक्षकांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जवळपास सातशे शिक्षक व शंभर अधिकाऱ्यांनी “आय वॉन्ट चॅलेंज’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी दिलेल्या सूचनांनुसार विद्या प्राधिकरणाने राज्यातील शिक्षक व अधिकाऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविले होते. या शिक्षकांनी आहे त्या पगारावर मात्र आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये काम करणे शिक्षण विभागाला अपेक्षित आहे. राज्यातील शंभर ठिकाणी पुढील काही दिवसांत आंततराष्ट्रीय शाळा तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये ग्रामीण भाग, डोंगराळ व दुर्गम भाग, तसेच शहरातील झोपडपट्टी असणारा भागाची निवड शाळांसाठी केली जाणार आहे. यासाठी चांगल्या शिक्षकांची शिक्षण विभागाला गरज भासणार आहे. या आंतरराष्ट्रीय शाळांसाठी काही उद्धिष्ट निश्‍चित करण्यात आली आहेत. ही उद्धिष्ट निश्‍चित करत आव्हाने स्विकारणाऱ्या शिक्षकांना आता शिक्षकांना शिक्षण विभागाकडून या आंतरराष्ट्रीय शाळांसाठी काम करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. यामध्ये केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, जेष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता व पाच शिक्षणाधिकारी मिळून साठ जणांचा समावेश आहे.