fbpx

अण्णांनी बोलावली कोअर कमिटीची तातडीची बैठक

टीम महाराष्ट्र देशा : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं उपोषण सातव्या दिवशीही सुरुच आहे. मात्र अण्णांच्या प्रकृतीबाबत आंदोलकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अण्णांनी कोअर कमिटीची तातडीची बैठक बोलावली आहे. यामध्ये पुढची रणनिती ठरवण्यात येईल.

जनलोकपाल, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचे बदल या मागण्यांसाठी अण्णांचं गेल्या सात दिवसांपासून रामलीलावर उपोषण सुरु आहे. 23 मार्चला म्हणजे शहीद दिनाच्या दिवशी अण्णांनी उपोषणाची सुरुवात केली होती. मात्र केंद्र सरकारकडून अद्याप आंदोलनाची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन मध्यस्थी करत आहेत, मात्र त्यांच्या शिष्टाईला अद्याप यश आलेलं नाही.

दरम्यान, उपोषणाबाबत पुढची रणनिती ठरवण्यासाठी अण्णांनी महत्वाची बैठक बोलावली. सरकारचे आत्तापर्यंतचे प्रस्ताव, अण्णांची ढासळत चाललेली प्रकृती या दोन्ही पार्श्र्वभूमीवर बैठकीत चर्चा होईल. अण्णांच्या प्रकृतीबद्दल कालपासून आंदोलकांमध्ये चिंता आहे.