कॉंग्रेसचा शिवसेनेला धोबीपछाड; वरोरा नगरपरिषदेतील नऊपैकी सात नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

uddhav thackeray

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा नगरपरिषदेतील शिवसेनेच्या 9 पैकी 7 नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दुसऱ्या बाजूला भद्रावती नगरपरिषदेतील शिवसेनेच्या 17 पैकी 12 नगरसेवकांचा काँग्रेस मधला प्रवेश शिवसेनेच्या नेत्यांनी ऐनवेळी रोखलाय. काँग्रेस आमदार बाळू धानोरकर यांच्या या खेळीमुळे जिल्ह्यातील राजकारणासोबतच राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा काँग्रेस विरुध्द शिवसेना हा संघर्ष उफाळून आलाय.

मागच्या लोकसभा निवडणुकीत स्वतः धानोरकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसची उमेदवारी मिळविली आणि ते विजयीही झालेत. खासदार धानोरकर यांच्यावर काँग्रेसचा खाली गेलेला ग्राफ उंचावण्याची जबाबदारी आली. खा. धानोरकर यांनी स्वतःच्या पत्नीला वरोरा-भद्रावती विधानसभेची तिकीट पक्ष दिग्गजांच्या नाराजीनंतर मागून घेतले. प्रतिभा बाळू धानोरकर आमदार झाल्याही, मात्र नंतर कोरोना वाढला आणि काँग्रेसवाढीचे प्रयत्न रखडले होते. आता याला आज मुहूर्त मिळाल्याची चर्चा होती.

याबद्दल बोलताना शिवसेनेचे चंद्रपूर संपर्क प्रमुख प्रशांत कदम म्हणाले 7 नगरसेवक काँग्रेसमध्ये गेल्याने आम्हाला तिळमात्रही फटका बसलेला नाही. खासदार बाळू धानोरकर यांनी शक्तिप्रदर्शन दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. खासदार धानोरकर यांनी दहशत आणि दबावाखाली या नगरसेवकांचा प्रवेश करून घेतला आहे. कारण या सगळ्यांशी आमचं बोलणं झालं होतं. ज्यावेळी बाळू धानोरकर शिवसेनेत होते त्यावेळी त्यांनीच त्यांना निवडून आणलं होतं. पण आता फक्त दहशतीखाली त्यांनी प्रवेश करून घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या