fbpx

आकस्मिकता निधीच्या मर्यादेत दोन हजार कोटी रुपयांची वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत शासनाकडून सात महत्वपूर्ण निर्णय

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात यंदा गंभीर दुष्काळ असल्याने अनेक शेतकरी हे हतबल झाले आहेत. अशा दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना व दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून राज्य शासनाकडून आकस्मिकता निधीच्या मर्यादेत दोन हजार कोटी रुपयांची तात्पुरत्या स्वरुपाची वाढ करण्यात आली आहे. ही रक्कम दुष्काळग्रस्तांच्या खात्यात जमा करावी याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत.

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शासनाकडून सात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.या योजनेमध्ये पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात ३४९ फिरते पशुवैद्यकीय चिकित्सालय स्थापन करणार आहेत.तसेच केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान ही योजना राज्यात राबविणार आहेत.त्याचबरोबर नागपूर व अमरावती विभागातील लिलावाद्वारे किंवा अन्य प्रकारे भाडतत्त्वावर दिलेल्या नझूल जमिनी फ्री होल्ड करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान ही योजना राबवण्यात येणार आहे. राज्यातील सहकारी सुतगिरण्यांना अर्थसहाय्य करण्याच्या आकृतीबंधात ०५:४५:५० प्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे.