शिवसृष्टीच्या जागेवर तोडगा निघाला…

पुणे : शिवसृष्टीच्या जागेवर तोडगा निघाला असून चांदणी चौकातील बीडीपीच्या 50 एकर जागेत शिवसृष्टी होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत केली. त्यासाठी निधीपण देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या निर्णयामुळे वनाज- रामवाडी मेट्रोचे काम वेगात होणार आहे. कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेत मेट्रोचा डेपो होणार हे स्पष्ट झाले आहे. 11 फेब्रुवारीपासून होणारे आंदोलन मागे घेत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक मानकर यांनी सांगितले आहे.