fbpx

धनंजय मुंडे करतात सेटलमेंट

dhananjay-munde..

टीम महाराष्ट्र देशा- धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते झाल्यानंतर त्यांनी केवळ मुख्यमंत्र्यांच्या पायावर लोळण घेवून पदाचा वापर केला आहे. धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या अ‍ॅन्टीचेंबरमध्ये दोन-दोन तास बोलत बसतात. या त्यांच्या वर्तनास ‘सेटलमेंट’ असे म्हणतात. मुख्यमंत्र्यांशी सेटलमेंट करणारा विरोधी पक्षनेता कसा होऊ शकतो?असा सवाल पर्यावरण मंत्री तथा शिवसेना नेते रामदास कदम यांनी उपस्थित केला.

खेडमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने झालेल्या निर्धार परिवर्तनाचा यात्रेदरम्यान मुंडे यांनी रामदास कदम आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. मुंडे यांच्या टीकेला कदम यांनी खेड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांकडे लाचारी पत्करणार्‍या धनंजय मुंडे यांना विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीत बसण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही, असा पलटवार देखील त्यांनी केला.

दरम्यान,याच पत्रकार परिषदेत खेडच्या महाड नाका येथील मैदानात आगामी महिनाभराच्या कालावधीत शिवसैनिकांची जाहीर विराट सभा घेऊन राष्ट्रवादीला उत्तर देण्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी ना. कदम यांनी केली.