fbpx

सेट-नेट परीक्षेविषयी मंगळवारी विद्यापीठात कार्यशाळेचे आयोजन

Solapur University

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व सेट-नेट परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंगळवार, १९ मार्च २०१९  रोजी मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी दिली.

या कार्यशाळेचे उद्घाटन मंगळवार, १९  मार्च रोजी सकाळी १०.३०  वाजता कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एस. आय. आय. पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यशाळेत लातूरच्या दयानंद कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्रा. डॉ. ब्रिजमोहन दायमा, डॉ. सारिका दायमा, अक्कलकोटच्या मंगळूरे प्रशालेतील धानय्या कौटगीमठ हे तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

सेट-नेट पेपर क्रमांक एकविषयी या कार्यशाळेत प्रामुख्याने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मंगळवारी दिवसभर तज्ञांकडून या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या विशेष कक्ष विभागाकडून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
पात्र उमेदवारांनी या कार्यशाळेस उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलसचिव डॉ. घुटे यांनी केले आहे.