कुलगुरूंच्या लेखी अश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी सोडले उपोषण

set exam answer
पुणे : सावित्राबाई फुले विद्यापीठाकडे जबाबदारी असलेल्या सेट परीक्षेचा निकाल काही दिवसापुर्वी जाहीर निकालामध्ये एकूण २५०० विद्यार्थ्यांना विद्यापीठाने पात्र असून सुद्धा अपात्र दाखवले आहे. याविरोधात विद्यार्थ्यांनी आमरण उपोषण केलं होत कुलगुरूंच्या आश्वासना नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं असल तरीही विद्यार्थी वर्गा मध्ये नाराजीच वातावरण तयार झालं आहे .
सेट परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका म्हणून ओएमआर शीट देण्यात आल्या होत्या. त्यावर बैठक , सांकेतांक क्रमांक शाईने गडद करून भरायचा असतो मात्र काही विद्यार्थ्यांकडून ही माहिती भरण्यास गफलत होती. त्यामुळे विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना शून्य गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे परीक्षेत पास असून नापास दाखवलेल्या विद्यार्थ्यांनी आमरण उपोषण केले. आज विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्या  तात्पुरत्या मान्य केल्या असून या प्रश्नावर समिति गठित करून ४५ दिवसात निकाल लावण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र विद्यार्थ्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असून कूगूरूनी तोंडाला पानं पूसल्याचे म्हटले आहे. उपोषणाला विद्यार्थ्यांसोबत बसलेले जनता दल युनायटेड चे प्रदेश सरचीटनीस म्हणाले कुलगुरूंनी आम्हाला लेखी आश्वासन दिले आहे. त्यावर आम्ही समाधानी नसून विद्यापीठाने लवकर विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करावे. पक्षाचे आमदार कपिल पाटील यांनी पाठपुरवठा करून, कुलगुरूंसोबत बोलून विद्यार्थ्यांना न्याय दिला आहे. विद्यापीठने लवकर निकाल जाहीर केले नाही तर जेडीयू तीव्र आंदोलन छेडणार आहे.