शिवसेनेच्या शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात महिलांवर पैशांची उधळण

संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद आणि सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई: शिवजयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात भांडुप येथील प्रतापनगर परिसरात भोजपुरी गाण्याच्या ठेक्यावर बिभत्स नृत्य करत कार्यक्रमात महिलांवर पैशांची उधळण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. नागरिकांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या कॅमेरात कैद केला आणि  सोशल मीडियावर व्हायरल केला.

भांडुप येथील प्रतापनगर परिसरात शिवजयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी हा कार्यक्रम वीर संभाजी मार्केट परिसरात आयोजित करण्यात आला. प्रतापनगर येथील शिवसेनेचे उपशाखाप्रमुख राजू मगर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

भांडुप येथील प्रतापनगर परिसरात शिवजयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या दरम्यान एका भोजपुरी गाण्याच्या ठेक्यावर बिभत्स नृत्य करत कार्यक्रमात महिलांवर पैशांची उधळण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. कार्यक्रम सुरू असताना भोजपुरी गाणे लागताच बिभत्स नृत्य सादर करणाऱ्या महिलांवर पैसै उधळण्यात आले. त्यामुळे नागरिकांमधून या घटनेचा निषेध होत असून सगळीकडे संतापाची लाट पसरली आहे. शिवसेनेच्याच कार्यक्रमात संपूर्ण घडल्यामुळे शिवप्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

( इनाडू ने दिलेल्या वृत्तानुसार बिभत्स नृत्य करत महिलांवर पैशांची उधळण करण्यात आली)

 

 

 

You might also like
Comments
Loading...