लस उत्पादन ही विशेष प्रक्रिया आहे त्यामुळे एका रात्रीतून उत्पादन वाढवणं शक्य नाही – अदर पूनावाला

adar poonawala

नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविशिल्ड लशीची निर्मिती केली जात आहे. लशीच्या निर्मितीबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. कोरोना लस उत्पादकांना सरकारने दिलेल्या ऑर्डरबाबत परस्परविरोधी अहवाल आणि वादारम्यान त्यांनी सोमवारी कंपनीला २६ कोटी डोसची ऑर्डर मिळाली असल्याचं सांगितलं आहे.

केंद्र सरकारने पीआयबीमार्फत लसींच्या पुरवठ्याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. यानंतर बऱ्याच घडामोडी आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. याबाबत अखेर अदर पुनावाला यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. लस उत्पादन ही विशेष प्रक्रिया आहे. त्यामुळे एका रात्रीतून उत्पादन वाढवणं शक्य नाही, असं अदर पुनावाला म्हणाले. तर, त्यांच्या स्पष्टीकरणात त्यांनी केंद्र सरकारनं 26 कोटी डोसची ऑर्डर दिल्याचं देखील मान्य केलं आहे.

‘आम्हाला आतापर्यंत २६ कोटी डोसची ऑर्डर मिळाली असून त्यापैकी १५ कोटीहून अधिक डोस पुरवण्यात आले आहेत. भारत सरकारकडून पुढील काही महिन्यात ११ कोटी डोससाठी १७३२.५० कोटी रुपयांची १०० टक्के आगाऊ रक्कमही मिळाली आहे. दुसऱ्या टप्प्यात ११ कोटी डोस राज्य आणि खासगी रुग्णांलयात पुरवण्यात येतील’ अशी माहिती पूनावाला यांनी एका निवेदनात दिली.

‘लशीचं उत्पादन करणं ही एक विशेष प्रक्रिया आहे, त्यामुळे एका रात्रीत उत्पादन वाढणं शक्य नाही. तसंच भारताची लोकसंख्याही मोठी आहे. सर्व लोकांसाठी पुरेसे डोस तयार करणं सोपं काम नाही. तुलनेने कमी लोकसंख्या असलेले अगदी मोठे प्रगत देश आणि कंपन्याही यासाठी संघर्ष करत असल्याचं’, आदर पूनावाला यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या