मोदी-शहांना धक्का; भाजपशासित राज्यात ‘एनआरसी’ विरोधी प्रस्ताव विधानसभेत मंजूर

टीम महाराष्ट्र देशा : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) विरोधात देशाची राजधानी दिल्लीमध्ये जोरदार आंदोलन सुरू आहे. सोमवारी या आंदोलनाने हिंसक रुप घेतले आणि यात 9 जणांना प्राण गमवावे लागले. तसेच राजधानीतील वातावरणात तणाव आहे.

केंद्र सरकारचे दिल्लीतील परिस्थितीवर बारीक लक्ष आहे. आता भाजपची सत्ता असणाऱ्या एका राज्याने एनआरसीविरोधातील प्रस्ताव विधानसभेमध्ये मंजूर केला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसशासित राज्यांनी याआधीच एनआरसीला विरोध केल्यानंतर आता भाजपशासित बिहार राज्याचाही यामध्ये समावेश झाला आहे. भाजपलाहा धक्का मानला जात आहे.

Loading...

आसाम वगळता देशात अन्यत्र राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनआरसी) लागू करण्याची आवश्यकता नाही असे सांगत बिहारमध्ये एनआरसी लागू करणार नाही, असे स्पष्ट मत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी याआधीच व्यक्त केले होते. विशेष म्हणजे बिहारमध्ये जदयूसोबत भाजपची युती आहे. तसेच बिहार भाजपनेही याबाबत ठरावाला विरोध केला नाही.

 

आज  २५ फेब्रुवारी, मंगळवारी बिहार विधानसभेमध्ये एनआरसीविरोधातील प्रस्ताव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. तसेच एनपीआरमध्ये सुधारणेसाठीचा प्रस्तावही संर्वसंमतीने मंजू करण्यात आला. यावेळी २०१० च्या आधारावर एनपीआरचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. याचा अर्थ एनपीआरसाठी आई-वडिलांची माहिती देण्याची आवश्यकता नाही.

दरम्यान, सीएए-एनआरसी संदर्भात राजद नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत राजद नेते अब्दुलबारी सिद्दिकी, अवधेश सिंह, ललित यादवही उपस्थित होते. सीएएमध्ये मुसलमानांचाही समावेश करण्यात यावेळी अशी मागणी तेजस्वी यादव यांनी केली. तसेच या भेटीनंतर बोलताना ते म्हणाले की, जे लोक एक इंचही मागे हटणार नव्हते, त्यांना आज पळावे लागत आहे. ज्या राज्यांनी एनआरसी आणि एनपीआर लागू करणार नाही असे म्हटले त्यात बिहारचाही समावेश असून येथे भाजपचेच सरकार आहे, असेही ते म्हणाले.

 

हेही पहा –

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश