Share

Nitesh Rane । “हिंदू मुलींचं धर्मांतर करण्यासाठी रेट कार्ड…”; नितेश राणेंचे गंभीर आरोप

Nitesh Rane । मुंबई : भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी कोल्हापूरमधील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणावर भाष्य करत गंभीर आरोपही केले आहेत. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा धर्मांतरविरोधी कायद्याचा उल्लेख केला असून, त्याचा अभ्यास सुरु असल्याची माहिती दिली आहे. ‘लव्ह जिहाद’ सारख्या प्रकरणात काही पोलीस अधिकारी संबंधितांना मदत करतात असा आरोपही त्यांनी केला आहे.

ते म्हणाले, ‘तरुणींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर करण्याचे प्रकार वाढत आहेत. यासाठी या तरुणांना पैसे, गाड्या पुरवणारी एक यंत्रणा कार्यरत आहे. हे एक षड्‍यंत्र आहे. असे प्रकार पुढे आले की, कारवाई करण्यात कायदेशीर अडचणी असतात. उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक या राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदा करण्याचा आमचा विचार सुरू आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात देशातील सर्वांत चांगला धर्मांतरविरोधी कायदा आम्ही करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.

नितेश राणे म्हणाले, “हिंदू मुलींचं धर्मपरिवर्तन करण्यासाठी पैसे दिले जातात, बाईक दिली जाते. धर्मपरिवर्तनाला बळ देण्यासाठी आर्थिक मदत केली जात आहे. रेट कार्ड करण्यात आलं आहे. शीख तरुणीला फसवलं तर सात लाख, पंजाबी हिंदू तरुणीला फसवलं तर सहा लाख, गुजराती ब्राह्मण तरुणीसाठी सहा लाख, ब्राह्मण तरुणीसाठी पाच लाख, क्षत्रिय तरुणीसाठी चार लाख असं रेट कार्ड असल्याचे आरोप त्यांनी केले आहेत.

“कोल्हापूरमधील तरुणी १८ दिवसांपासून गायब होती. आम्ही जन आंदोलन केल्यानंतर ती तरुणी काही तासात घरी कशी येते?,” असा प्रश्न उपस्थित करत नितेश राणेंनी पोलिसांच्या कारवाईवर शंका घेतली आहे.तसेच हिंदू म्हणून आवाज उठवणाऱ्यांना सुखरुप घरी पाठवेन असा शब्दही नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आंदोलकांना दिला. नितेश राणे म्हणाले, तुम्ही हिंदू म्हणून आवाज उठवा, एकत्र या. तुम्हाला पुढे कसं सुखरुप घरी पाठवायचं हे नितेश राणे पाहून घेईल. मी तुम्हाला शब्द देतो. कारण तिथं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) गृहमंत्री म्हणून बसले आहेत हे लक्षात ठेवा.

महत्वाच्या बातम्या :

Nitesh Rane । मुंबई : भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी कोल्हापूरमधील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणावर भाष्य करत गंभीर आरोपही …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now