कडकनाथ रिटर्न्स ? रोहित पवारांवर आणि बारामती ॲग्रोवर शेतकऱ्याने केले गंभीर आरोप

रोहित पवार

पुणे – कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेची घडी बिघडली असल्याचे चित्र आहे. या काळात शेतकऱ्यांचे तसेच शेतीशी निगडीत अनेक व्यवसायांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना मदत ना राज्य सरकारकडून दिली जात आहे ना केंद्र सरकार कडून ठोस मदत दिली जात आहे.

या काळात पोल्ट्री व्यावसायिकांना देखील अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोना काळात काहीप्रमाणात ग्राहकांनी पाठ फिरवली असल्या कारणामुळे या व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला आता आमदार रोहित पवार यांच्या बारामती एग्रो या संस्थेच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या पोल्ट्री व्यवसायातील व्यावसायिकांना देखील विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.

योगेश चौरे यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मधून या सावळ्या गोंधळला वाचा फोडली आहे. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, रोहीत पवारांच्या बारामती ॲग्रोने कोंबड्यांना कितीही डॅमेज केले तरी आम्हाला त्यांना खायला घालावचं लागतं. दुपारी पोस्ट टाकल्यानंतर शेडवर होतो. सकाळी पण शेडवरच असेल. फीडिंग कराव लागतं. कोंबड्यांना उपाशी मारता येत नाही. तेवढी माणुसकी अजुन शिल्लक आहे. असे त्यांनी म्हटले आहे.

याशिवाय त्यांनी आणखी एक पोस्ट करून पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शेतकऱ्याचं नुकसान झालं तर पवार साहेब बांधावर जावुन पाहणी करतात. नवं पर्व शेतकऱ्याला एसीमधे पण मीटींग द्यायला तयार नाही असे त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP