Winter Session 2022 | नागपूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू झाले आहे. या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर होणाऱ्या या अधिवेशनात अनेक मोठ्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी पहिल्या दिवशी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा मुद्द्यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये वादावादी झाली. आज विरोधकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केला. यामुळे विरोधक आणि सत्ताधारी चांगलेच आमने-सामने आले आहेत.
नगर विकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी केलेल्या नागपूर सुधार प्रन्यासच्या भूखंड वाटपाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाने या निर्णयावर ताशेरे ओढले आहे. या मुद्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने मंगळवारी विधानपरिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ८३ कोटीचा भूखंड दोन कोटी रुपयांना देणं म्हणजे मंत्री पदाचा दुरुपयोग तत्कालीन नगर विकास मंत्री तसेच विद्यमान मुख्यमंत्र्यांनी केला आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला.
छगन भुजबळ म्हणाले, “मुख्यमंत्री यांनी नगरविकास मंत्री असताना ८३ कोटी रुपयांचा भूखंड केवळ २ कोटी रुपयांना दिला. म्हणून वरिष्ठ सभागृहातही गदारोळ सुरू आहे. आपलं सभागृह देखील सर्वात मोठं आहे. येथे लोकप्रतिनिधी सर्वात जास्त आहेत. त्यामुळे ८३ कोटींचा भूखंड अवघ्या दोन कोटीत कसा दिला? हा भ्रष्टाचार नाही का? की यांनीही रेवड्या वाटल्या.”
भुजबळांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “छगन भुजबळ यांनी वरच्या सभागृहाचा उल्लेख केला. तिथे मी खुलासा केला आहे. मुख्यमंत्र्यांवर चुकीचे आरोप लावणे योग्य नाही. भुजबळसाहेब मी तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, ८३ कोटी वगैरे आस्मानी आकडे पूर्णपणे चुकीचे आहेत. मी वरच्या सभागृहात उत्तर दिलंय, येथेही देतो. आम्ही भूखंडाचे श्रीखंड खाणारे नाहीत.” यावर आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर द्यावे, अशी विनंती केली.
महत्वाच्या बातम्या :
- Saroj Ahire | “विधीमंडळाच्या इमारतीमध्ये हिरकणी कक्षाची स्थापना”; सरोज अहिरे यांच्या हस्ते उद्घाटन
- Uddhav Thackeray | शिवसेना मजबूत आहे आणि ती आणखी मजबूत होईल – उद्धव ठाकरे
- Ajit Pawar | “कोयता गँगला मोक्का लावा, तडीपार करा”; अजित पवार यांची विधानसभेत मागणी
- Winter Session 2022 | सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक भिडे वाडा येथे करण्याबाबत राज्य शासन गंभीर – मुख्यमंत्री
- Winter Session 2022 | भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरू करा ; छगन भुजबळ यांची मागणी