बिग बॉसमधील ‘या’ अभिनेत्रीचे निर्मात्यावर गंभीर आरोप

Sharmishtha raut

मुंबई : प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉस द्वारे घराघरात पोहचलेल्या शर्मिष्ठा राउतने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर करत प्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्यावर मानधन थकवल्याचा आरोप केला आहे. ती करत असलेल्या चॅनलला उत्तम प्रतिसाद असुनही कलाकाराना त्याचा मोबदला मिळत नसल्याचा आरोप शर्मिष्ठाने केला आहे. तिच्या या पोस्टने चांगलीच खळबळ उडाली आहे.

आपल्या इन्स्टाग्राम या सोशल संकेतस्थळावर लिहिलेल्या पोस्ट मध्ये म्हणले आहे की, आम्ही कलाकार कोणतेही चॅनल असो नेहमीच चांगल्या कामासाठी मेहनत घेत असतो. याबदल्यात योग्य मोबदला मिळावा अशी कलाकारांची अपेक्षा असते. प्रोजेक्ट आपलं बाळ आहे, प्रोडक्शन हाऊस आपलं घर आहे, असं समजून सेटवर कधी काही गोष्टी मिळत नसेल तरीही परिस्थितीशी तडजोड करून सर्व तंत्रज्ञ आणि कलाकार अविरतपणे काम करत असतात. वाहिनीचा उत्तम पाठिंबा असतानाही निर्माता कामाचा मोबदला देत नाहीत, अशा आशयाची पोस्ट तिने शेअर केली आहे.

तसेच आपल्याच मेहनतीचा हक्काचा पैसा, मोबदला भीक मागितल्यासारखा सतत मागत राहणे योग्य आहे का ? असा प्रश्नही तिने या पोस्टच्या माध्यमातून उपस्थित केला. मागील १३ वर्षांपासून ती कलाक्षेत्रात काम करत आहे. आतापर्यंत कोणत्याही निर्मात्याने पैसे बुडवले नाहीत. मात्र, प्रसिद्ध निर्माता मंदार देवस्थळी यांनी सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांचे पैसे थकवले आहेत. मात्र, निर्मात्यांनी त्यांचे पैसे बुडवले, असा आरोप तिने केला आहे. शर्मिष्ठाची ही पोस्ट मालिकेतील इतर कलाकार संग्राम सामेल, विदिशा म्हसकर, मृणाल दुसानीस यांनीही आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर करत तिला पाठिंबा दर्शवला आहे.

महत्वाच्या बातम्या