पाकिस्तानमध्ये झिंग झिंग झिंगाट; नागराजचा सैराट पाकिस्तानमध्ये झळकणार

टीम महाराष्ट्र देशा- नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या सिनेमाने राज्यासहित देशोदेशीच्या प्रेक्षकांना याड लावलं. आणि आता ते वेड लावायला जातोय पाकिस्तानात. आता हा सिनेमा पाकिस्तानमध्येही दाखवला जाणारे. पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पाकिस्तान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये म्हणजेच पीफसाठी सैराटची निवड करण्यात आलीय.

बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट असलेल्या ‘सैराट’ची अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे. आता भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानमधील प्रेक्षकांना ‘सैराट’ पाहण्याची संधी मिळणार आहे.

सैराटशिवाय या महोत्सवात नऊ भारतीय सिनेमे दाखवले जाणारेत. यात एसएस राजमौली यांचा बाहुबली टू द कनक्लूजन, डिअर जिंदगी, आओं देखी, हिंदी मीडियम, कडवी हवा, नील बाटे सन्नाटा आणि साँग्ज ऑफ स्कॉरपियंस हे सिनेमेही दाखवले जाणारेत.पाकिस्तानात भारतीय चित्रपटांना मागणी आहे.

You might also like
Comments
Loading...