‘३५ अ’ कलम रद्द झाल्यास राज्यविषयक कायदा संपुष्टात येईल –ओमर अब्दुला

Omar_Abdullah

श्रीनगर: घटनेतील ‘३५अ’ कलम रद्द झाल्यास काश्मीर विषयक कायदे संपुष्टात येतील अशी टीका काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज केले आहे. ‘३५ अ’ कलमावरून भाजप जम्मू विरुद्ध काश्मीर असा वाद निर्माण करत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. ‘३५ अ’ कलम रद्द केल्याने जम्मू आणि काश्मीरमध्ये बाहेरील लोकांना जमिनी विकत घेता येतील, ते सरकारी नोकऱ्या मिळवतील. येथील सरकार त्यांच्या मुलांना शाळांमध्ये शिष्यवृत्या देईल, आरोग्याच्या सोयी सुविधाही मिळतील. तसेच हे कलम रद्द केल्यास काश्मीरला त्याचा फायदा होईल,असे सांगून भारतीय जनता पक्ष जनतेची दिशाभूल करीत आहे. येथे जमीनीची खरेदी करणारे आणि रोजगार मिळविणारे प्रथम जम्मूमध्ये जातील त्यामुळे साहाजिकच काश्मीरकडे दुर्लक्ष होईल. येथील जनता स्वत: सुरक्षित नाही तर बाहेरुन येणारे नागरिक येथे जमीनी घेऊन काय करतील, असा प्रश्नही त्यांनी विचारला.