मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणे हा भारतीय जनता पार्टीचा छुपा अजेंडा; शिवसेनेचा घणाघात!

modi udhav thakre

मुंबई:- महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरुन आता राजकारण पेटायला सुरुवात झाली आहे. मराठी अस्मिता, मराठी शक्ती जोपर्यंत एकवटत नाही तोपर्यंत कर्नाटक सीमवादाचा प्रश्न सुटणार नाही, असं सांगतानाच कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केली आहे.

त्यानंतर आता कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव सोडा मुंबईही आमचाच भाग आहे, अशी मुक्ताफळं उधळली आहे. मुंबईवर आमचा हक्क आहे, अशी दर्पोक्ती कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे. इतकच नाही तर मुंबई प्रदेश केंद्रशासित करा अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं वक्तव्यही सवदी यांनी केलंय. सवदी यांच्या या वक्तव्यामुळं सीमाभागात संतापाची लाट पसरली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि आमदार मनीषा कायंदे यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवडी यांना फटकारले आहे. कर्नाटक राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य कुटीलपणाचे असून, भारतीय जनता पार्टीचा तो छुपा अजेंडा आहे असे कायंदे यांनी म्हटले आहे.

मुंबईला महाराष्ट्रापासून तोडा हा त्यांचा खरा चेहरा या निमित्ताने समोर आलेला आहे. पूर्वीदेखील मुंबईला गुजरातला जोडण्याचे प्रयत्न झाले आणि आता कर्नाटक महाराष्ट्र सीमा वादाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे, असंही मनीषा कायंदे म्हणाल्यात.

महत्वाच्या बातम्या