शहापूर-मुरबाड प्रकल्पग्रस्तांना धरणाचे पाणी मिळण्याचा कायदा करणार

शहापूर तालुका हा मुंबई आणि ठाण्याला पाणी देतो, मात्र त्याचा स्वत:चा घसा मात्र कोरडा आहे. हे अनेक वर्षांपासून आपण जाणतो, मात्र यावर काही उपाय करण्यात आला नव्हता. आता मात्र आपण शहापूर व सभोवतालची 285 गावे आणि पाड्यांना गुरुत्वाकर्षणावर आधारित पाणी योजनेसाठी 200 कोटी रुपये देण्याचे निश्चित केले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात सांगितले. ज्यांच्या जमिनी धरणासारख्या प्रकल्पांमध्ये जातात त्या गावांना त्या धरणातून मिळणाऱ्या पाण्यापासून निश्चितपणे फायदा कसा मिळेल यासंदर्भात लवकरात लवकर कायदा करण्यात येईल.