संस्कारी पहलाज निहलानी यांच्या कार्यकाळात ‘या’ सिनेमावरून झाले वाद

pahlaj nihlani controversy

वेबटीम : सेन्सॉर बोर्ड नेहमीच सिनेमातील दृश्यांची काटछाट करण्यासाठी चर्चेत असतो ,मात्र सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या कार्यकाळात बोर्डाचा हस्तक्षेप जरा जास्तच वाढला होता.बऱ्याच सिनेमातील दृश्य,शब्द,यांच्यामुळे झालेल्या वादामुळे निहलानी टीकेचे धनी बनले होते.कोणते होते ते चित्रपट नेमका काय आक्षेप होता चला पाहूया

या सिनेमांवर चालवली निहलानी यांनी कात्री

बदलापूर(फेब्रुवारी2015)

वरून धवन आणि नवाजुद्दीन सिद्धीकी यांचा हा पहिला चित्रपट होता ज्याला निहलानी याच्या संस्कारी कात्रीचा सामना करावा लागला.

एन एच10(मार्च 2015)

अनुष्का शर्मा आणि यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात 9 कट मारण्यात आले तसेच A सर्टीफिकेट देण्यात आले.

बॉम्बे वेलव्हेट (मे 2015)

प्रतिबंदीत शब्दांचा दाखला देत सिनेमातून बॉम्बे हा शब्द वगळण्यात यावा असं निहलानी यांना वाटत होतं

उडता पंजाब(जून 2017)

89 कट्स सुचवण्यात आले तसेच पूर्ण सिनेमातून पंजाब हा शब्द वागण्यात यावा असं निहलानी यांना वाटत होतं

हरामखोर(जानेवारी2017)

श्वेता त्रिपाठी आणि नवाजुद्दीन सिद्धीकी यांचा हा सिनेमा .शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या नात्यावर आधारित या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने मान्यतेचं प्रमानपत्रच देण्यासाठी नकार दिला होता.

लिपस्टिक अंडर माय बुरखा(जुलै2017)

निहलानी यांनी या सिनेमाला असंस्कारी घोषित केले तसेच भारतात या सिनेमावर बंदी घातली होती.कोर्टाने आदेश दिल्यावर या सिनेमाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला