fbpx

शेअर बाजारातील 1200 अंकांच्या घसरणीमुळे 5.4 लाख कोटी बुडाले

sensex

मुंबई  : जागतिक शेअर बाजारातील मंदीमुळे भारतीय शेअर बाजार तब्बल 1274 अंकांनी कोसळलाय, निप्टी देखील 390 अंकांनी घसरलाय. शेअर मार्केटमधील गेल्या दोन वर्षातील आजच्या या सर्वात निच्चांकी पडझडीमुळे गुंतवणूदारांचे तब्बल 5.4 लाख कोटींचं नुकसान झालं आहे

मुंबई शेअर बाजारात आज (मंगळवार) सकाळी तब्बल 1200 अंकांची घसरण पहायला मिळाली. तर राष्ट्रीय शेअर बाजारामध्येही 371 अकांपेक्षा अधिक घसरण झाली आहे. 2015 नंतर आज पहिल्यांदाच मुंबई शेअर बाजारात सर्वात मोठी घसरण झाली आहे. अमेरिकन बाजारपेठेतल्या पडझडीचा परिणाम आज भारतीय बाजारावर दिसून आला.

अमेरिकेची अवस्था नाजूक असताना फेडरल बँकेने व्याजदर शून्य टक्क्यांवर आणले होते. मात्र, आता अर्थव्यवस्था रुळावर येऊ लागल्याने व्याजदर 1 टक्का करण्यात आले, पण ते आणखी दोन टक्क्यांनी वाढून 3 टक्क्यांपर्यंत व्याजदर जाऊ शकतात, असे फेडरल बँकेनं सूचित केलं आहे. परिणामी विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसा काढून घेतला असून अर्थसंकल्पात दीर्घ गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्यावर व्याज लावण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांनी केली आहे. त्याचाही परिणाम बाजारात दिसून येतो आहे.