खळबळजनक: महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूनंतर अयोध्येत आणखी एका साधूचा संशयास्पद मृत्यू

das

अयोध्या : आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह संदिग्ध अवस्थेत सापडला होता. महंत नरेंद्र गिरी यांच्या अल्लापूर या येथील बाघंबरी या ठिकाणच्या निवासस्थानी हा मृतदेह सापडला असून पंख्याला लटकून त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतंय. त्या ठिकाणी सापडलेल्या सुसाईड नोटवरुन पोलिसांनी महंत नरेंद्र गिरी यांचा शिष्य आनंद गिरी याला अटक केली आहे.

दरम्यान आता महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर अयोध्येत आणखी एका साधूची संशयास्पद मृत्यूची बातमी समोर आली आहे. अयोध्येतील एका मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडल्याने साधुचं निधन झालं आहे. मृतक साधुचं नाव मणिराम दास असं आहे. दास यांनी आत्महत्या केली की दुसरं काही घडलं? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

पोलिसांनी दास यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा सध्या तपास करत आहेत.दरम्यान सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात मृतक साधू हे गेल्या अनेक दिवसांपासून नैराश्यात होते. पण ते नेमके नैराश्यात का होते? या मागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या