Share

Shinde-Fadanvis | “माझ्या जीवाला काही झालं तर शिंदे-फडणवीस जबाबदार”, ठाकरे गटातील खासदाराचा खळबळजनक आरोप

Shinde-Fadanvis | मुंबई :  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यामध्ये सरकार स्थापन केल्यापासून, राज्यात शिंदे गटाविरूद्ध ठाकरे गट झाला आहे. अशातच काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Shinde-Fadanvis) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. तसेच राजन विचारे यांनी पोलिस महासंचलकांना पत्र देखील पाठवलं आहे.

राजन विचारे यांचा आरोप –

शिंदे-फडणवीस सरकारच्या सूचनेनुसार पोलीस सरंक्षणात कपात करण्यात आल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला आहे. मला आणि माझ्या कुटुंबांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास मुख्यमंत्री आणि फडणवीस जबाबदार असतील आसं म्हणत माझ्या पोलीस सरंक्षणात वाढ करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

मी रात्री-अपरात्री माझ्या मतदारसंघांमध्ये फिरत असतो. अशा वेळेस माझ्यासोबत कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास किंवा हल्ला झाल्यास अथवा माझ्या कुटुंबियांना काही धोका निर्माण झाल्यास याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असतील, असं त्यांनी म्हटलं आहे.

९ ऑक्टोबर रोजी ठाण्यातील एका भाषणात शिवसेना नेत्या सुषमा अंधारे शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीका करत आहेत. यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पासून मनसे प्रमुख राज ठाकरेंसह अनेक दिग्गज नेत्यांचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला. ठाण्यातील कार्यक्रमात सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल होती. या प्रकरणी त्यांच्याविरोधात प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

यानंतर सुषमा अंधारे यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: सुषमा अंधारे यांनी याबाबत माहिती दिली आहे. माझ्या जीवाला धोका आहे, बाहेर पडू नका असे इनपुट मला आले असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या. माझ्यावरती केस किंवा हल्ला होऊ शकतो अशी माहिती मला देण्यात आल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगीतले. अंधारे यांना पोलिस संरक्षणाची देखील विचारणा करण्यात आली आहे. मात्र, मी या इनपूटकडे लक्ष न देता माझे काम करत राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या :

Shinde-Fadanvis | मुंबई :  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यामध्ये सरकार स्थापन केल्यापासून, राज्यात शिंदे गटाविरूद्ध ठाकरे …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now