शरद पवारांच्या भेटीपूर्वी सोनिया गांधीना आलेल्या पत्राने खळबळ

blank

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात महाशिव आघाडी स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. पण या भेटीपूर्वी सोनिया गांधीना आलेल्या एका पत्राने खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधीना जमिएत – ए – हिंद या संघटनेकडून पत्र आले आहे. या पत्रात ”धर्मांध शिवसेनेला महाराष्ट्रात पाठिंबा देऊ नये,” असे म्हटले आहे. यामुळे सोनिया गांधी यांच्यावरील दबाव वाढला आहे. आज शिवसेनेला महाराष्ट्रात पाठिंबा द्यायला द्यायचा की नाही, या संदर्भात सोनिया गांधी यांची शरद पवारांनी भेट घेतली. साधारण पाऊण तास त्यांच्यात चर्चा झाली. मात्र भेटीपूर्वी हे पत्र आल्याने पुन्हा राजकीय वर्तुळात वेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, कॉंग्रेसने शिवसेनेला पाठींबा दिल्यास काँग्रेसची राष्ट्रीय पातळीवर प्रतिमा मलीन होईल. त्यामुळे शिवसेनेला पाठिंबा देऊ नये, यासाठी काँग्रेसच्या दक्षिण भारतीय नेत्यांनी सोनिया गांधींना सल्ला दिला होता. केरळच्या मुस्लिम खासदारांची संख्या सर्वाधिक असल्याने केरळच्या खासदारांचा मोठा दबाव होता. केरळ राज्यातून काँग्रेसचे १८ खासदार निवडून आले आहेत. ही सर्वाधिक संख्या आहे.

एकीकडे मुस्लीम संघटनेचा वाढता दबाव आणि दुसरीकडे शरद पवारांसोबत झालेली चर्चा यातून सोनिया गांधी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :