मुंबई – राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांना कोरोणाची लागण झाल्यामुळे ते या बैठकीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित असणार आहेत.
मात्र मंत्रिमंडळाच्या या बैठकीला दादा भुसे , सुभाष देसाई, आदित्य ठाकरे गैरहजर असल्याचं समजतंय. यामुळं राजकारणात अजून कोणता मोठा भूकंप पडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीनंतरच काही ठरू शकतं, असे संकेत महाविकास आघाडीमधील एका मंत्र्यांनी दिले आहेत. आता या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रिमंडळ बैठकीनंतर राजीनामा देऊ शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चेनंतर विरोधी गटातही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: