नवी दिल्ली: चाळीस आणि त्यापुढील वयाच्या नागरिकांना बुस्टर डोस देण्याची शिफारस देशातील वरिष्ठ शास्त्रज्ञांनी केली आहे. ही शिफारस भारतीय SARS-CoV-२ जीनोमिक्स सिक्वेन्सिंग कन्सोर्टियमच्या (आयएनएसएसीओजी) साप्ताहिक अहवालामध्ये करण्यात आली आहे. कोरोनाच्या जीनोम सिक्वेन्सिंगवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या राष्ट्रीय चाचणी प्रयोगशाळांचे आयएनएसएसीओजी हे नेटवर्क आहे.
कोरोनाचा नवा उत्परिवर्तित विषाणू ‘ओमायक्रॉन’च्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची बुस्टर डोस देण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच लोकसभेतही कोरोना साथीच्या सद्यस्थितीबाबत चर्चा करताना अनेक खासदारांनी बुस्टर डोस देण्याची मागणी केली होती.
दरम्यान जोखमीच्या गटातील नागरिक म्हणून लसीकरण न झालेल्यांचे तातडीने लसीकरण करण्याबरोबर ४० वर्षांच्या आणि त्यावरील नागरिकांना बुस्टर डोस द्यायला हरकत नाही. तसेच संसर्गाची शक्यता अधिक असलेल्यांचाही बुस्टर डोससाठी विचार करणे आवश्यक आहे. कारण सध्याच्या लशींमध्ये कोरोना संसर्गाचा धोका कमी करण्याची क्षमता असली तरी ‘ओमायक्रॉन’वर प्रभावी ठरण्याची पुरेशी क्षमता नसू शकते, असे स्पष्टीकरण शास्त्रज्ञांनी केंद्राला दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोदींच्या पक्षाला एनडीएची गरज नाही, पण विरोधकांना यूपीएची गरज आहे’
- ‘लस नाही तर बस नाही,डोकं आहे पण मेंदू नाही’ संदीप देशपांडेंचा खोचक टोला
- काँग्रेसने लोकसभेत शंभरी पार केल्याशिवाय राष्ट्रीय पातळीवरील ‘गेम चेंज’ होणार नाही- शिवसेना
- भारतात ओमायक्रॉन आढळल्यास आश्चर्य वाटणार नाही- डॉ. समीरन पांडा
- …यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत आलेत का?- संजय राऊत