‘तिला मरू दे ना’…, बलात्कार पीडितेला मदत न करण्यासाठी आव्हाडांचा दबाव ?

jitendra awhad

मुंबई : गेल्या दोन महिन्यापासून एका प्रसिद्ध कॅसेट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्यावर एका महिलीने बलात्काराचा आरोप केल्याची बातमी चर्चेत आहे. २०१७ ते २०२० दरम्यान अत्याचार झाल्याचा सदर महिलेचा आरोप आहे. या महिलेच्या म्हणण्यानुसार भूषण यांनी आपल्याला एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम देण्याच्या बहाण्याने वेगवेळ्या ठिकाणी बोलावून बलात्कार केला. या गुन्ह्यात भूषण यांच्यावर ३७६, ४२०, ५०६ या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल असल्याचा दावा देखील पिडीत महिलेने केला आहे.

दरम्यान, या केसमध्ये आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे नाव आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्या मलिकार्जुन पुजारी या सामाजिक कार्यकर्त्याला धमकी देतानाची जितेंद्र आव्हाड यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

व्हायरल रेकोर्डिंग मधील संभाषण

जितेंद्र आव्हाड : तू कोणत्या तरी माणसाला एका पोरीवरून ब्लॅकमेल करत आहेस ?

मलिकार्जुन पुजारी : साहेब तुमच्यापर्यंत आलं का ?

जितेंद्र आव्हाड : माझ्यापर्यंत नाही ते प्रकरण शरद पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पर्यंत गेलंय…

मलिकार्जुन पुजारी : साहेब मी ब्लॅकमेल नाही करत, ती मुलगी आपल्याकडे न्याय मागायला आली होती.

जितेंद्र आव्हाड : अरे जाऊदे मरूदे तिला, कशाला करता नको ते उद्योग भे#$%… तो माणूस कोण आहे माहित आहे का तुला ?

मलिकार्जुन पुजारी : साहेब मला माहित आहे कोण आहे तो, मात्र ती मुलगी आपलं जीवन संपवायला गेली होती.

जितेंद्र आव्हाड : अरे जाऊदे मरूदे तिला, तु फुकट कशाला बदनाम होतो.

मलिकार्जुन पुजारी : मी कशाला बदमान होतो, मी तर त्याला काही बोललो नाही, उलट तोच मला बोलला की मुलीला समजवा गुन्हा दाखल करू देऊ नका, त्यानंतर मी त्याला सांगितलं की, मी काय समजवू बाबा, तुझं काय असेल तर तो भेटून गेलाय मला नवी मुंबईमध्ये, बोलला मी समजवतो त्या मुलीला….

जितेंद्र आव्हाड : तु काही मध्ये पडू नको…

आता ही ॲाडिओ क्लिप व्हायरल होत असून एका युजरने ट्विटरवर अपलोड केली आहे. ( या ॲाडिओ क्लिपच्या सत्यतेची आम्ही पुष्टी करत नाही )

दरम्यान, दुसरीकडे पीडितेला मदत करणारे वकील एस. बालकृष्णन यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘विचार करू शकता की, हे किती खेदजनक आहे. महाराष्ट्र सरकारचे एक कॅबिनेट मंत्री एका बलात्कार पीडितेविषयी म्हणतात की, तिला मरू द्या. जितेंद्र आव्हाड म्हणतात की, शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पातळीवर हे प्रकरण आहे. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे अनुभवी नेते बलात्कारासारख्या या प्रकरणात हस्तक्षेप करतील, हे मला पटत नाही. जितेंद्र आव्हाड पोलिसांवर दबाव टाकतात, हे चुकीचे आहे. मलिकार्जुन पुजारी यांनीदेखील कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार दिली पण पोलिसांनी एफआयआर नोंदवायला नकार दिला आहे.’ असं एस. बालकृष्णन म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या