Share

Bachhu Kadu । राणा, बच्चू कडू वाद मिटवण्यासाठी आता वरिष्ठ पातळीवर प्रयत्न; दोन्ही आमदारांना दिल्या ‘या’ सूचना

Bachhu Kadu । मुंबई: ठाकरे विरुद्ध शिंदे गटाचा वाद सुरु असतानाच आता आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana)  यांच्यातील वाद देखील चांगलाच पेटलेला दिसतोय. रवी राणा यांच्याकडून बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी पैसे घेतल्याचे आरोप करण्यात आले आहेत. रवी राणा यांच्या आरोपानंतर बच्चू कडू यांनी १ नोव्हेंबरला  गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा दिला आहे.

तसेच आपल्यासोबत सात ते आठ आमदार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील हा वाद मिटवण्यासाठी आता वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

या पार्श्वभूमीवर रवी राणा यांच्याशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी संवाद साधला आहे. तर बच्चू कडू यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला आहे. दोन्ही आमदारांनी माध्यमांशी संवाद साधू नये अशा सूचना रवी राणा आणि बच्चू कडू यांना देण्यात माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बच्चू कडू आणि रवी राणा यांचा हा वाद वरिष्ठांच्या मध्यस्तीने मिटणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

दरम्यान, एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना बच्चू कडू यांनी “मला गुवाहाटीवरून परत यायचं होतं”, अशी कबुली त्यांनी दिली. आमचे आमदार राजकुमार पटेल आधी गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर मीही गेलो. पण माझं असं म्हणणं होतं की, मी जाऊन एकनाथ शिंदेंसोबत काही मुद्द्यांवर बोलून परत येईल, असं वाटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

महत्वाच्या बातम्या :

Bachhu Kadu । मुंबई: ठाकरे विरुद्ध शिंदे गटाचा वाद सुरु असतानाच आता आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) आणि रवी राणा …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics