हरीश साळवे यांना जीवे मारण्याची धमकी 

Harish-Salve

टीम महाराष्ट्र देशा – सुप्रीम कोर्टात ‘पद्मावत’ चित्रपटाच्या अनुषंगाने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि चित्रपट निर्मात्यांच्या बाजूने खटला लढणाऱ्या वकील हरिश साळवे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शुक्रवारी साळवे यांना एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती वृत्त संस्थांनी दिली.

‘पद्मावत’ या चित्रपटावर कोणत्याही राज्य सरकारकडे बंदी आणण्याचा अधिकार नसल्याचा मुद्दा साळवे यांनी उचलून धरला होता.चित्रपटाच्या बाजूने वक्तव्य केल्यामुळे साळवेंना त्यांच्या कार्यालयातील दूरध्वनीवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने प्रसिद्ध केले. याप्रकरणी आता पोलीस तपास सुरु असून, त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.