fbpx

दिर्घकाळ वीजपुरवठा खंडित राहिल्याप्रकरणी वरिष्ठ अभियंता निलंबित तर 4 जणांना नोटीसेस

MSEB

पुणे : पुणे व पिंपरी शहर परिसरातील काही सोसायट्यांमध्ये खंडित वीजपुरवठ्याचा प्रदीर्घ कालावधी तसेच हा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्यासाठी दिसून आलेली दिरंगाई यामुळे महावितरणकडून प्रत्यक्ष कारवाईला सुरवात झाली आहे. यामध्ये एका उपकार्यकारी अभियंत्याला निलंबित करण्यात आले असून इतर चार अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी, की वाघोली, बालेवाडी व पिंपळे सौदागरमधील काही सोसायट्यांमध्ये गेल्या काही दिवसांत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले होते. तर काही सोसायट्यांमध्ये खंडित झालेल्या वीजपुरवठ्याचा कालावधी प्रदीर्घ होता. या प्रकाराची महावितरणकडून गंभीर दखल घेण्यात आली असून खंडित झालेल्या वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी जबाबदारी असलेल्या वरिष्ठ अभियंत्यांकडून दिरंगाई झाल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये दिसून आले. त्यामुळे वाघोली, बालेवाडी व पिंपळे सौदागरमधील वीजपुरवठा खंडित राहिल्याप्रकरणी एका उपकार्यकारी अभियंत्यास निलंबित करण्यात आले आहे तर 4 वरिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यातील शिवाय एका कार्यकारी अभियंत्यास सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.

विविध कारणांमुळे खंडित झालेला वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्यासाठी अभियंता व कर्मचाऱ्यांनी पूर्णपणे सतर्क व तत्पर राहावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा यापूर्वीच महावितरणकडून देण्यात आला होता. दिर्घकाळ वीजपुरवठा खंडित राहिल्याने वीजग्राहकांची गैरसोय होते तसेच महावितरणचे मोठे आर्थिक नुकसान होते. परंतु तीन ठिकाणी झालेल्या दिरंगाईमुळे महावितरणने वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरु केली आहे.

पावसाळ्यात खंडित झालेला वीजरपुरवठ्याच्या कालावधीवर नजर ठेवण्यासाठी प्रादेशिक कार्यालयात 24 तास सुरु असणारे नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले आहे. अधीक्षक अभियंता (संचालन) यांच्या नियंत्रणात हा कक्ष कार्यरत आहे. जास्त प्रदीर्घ कालावधीसाठी खंडित राहिलेल्या वीजपुरवठ्यावर या नियंत्रण कक्षाची नजर असून त्यासंबंधीचा अहवाल ताबडतोब वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात येतो.

आर्थिक व्यवहार ऑनलाईन न केल्याचा ठपका ठेवत कारणे दाखवा नोटीस

पर्यावरण पूरक गणेश विसर्जनात विद्यार्थांनी सहभागी होऊ नये