fbpx

काळ आला होता पण वेळ नाही…

nagrik
 नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक व भेंडा खुर्द गावामधील  मोठ्या प्रमाणात पाउस झाल्याने
ओढ्यास आलेल्या महापुरात वाहून गेलेल्या भेंड्यातील दोघांना वाचविण्यात यश आले आहे.स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रयत्नातून या दोघांना वाचवले .
          काल झालेल्या पावसामुळे भेंडा बुद्रुक व भेंडा खुर्द गावामधील ओढ्यास महापूर आला होता. दुपारी 2 पासूनच दोन्ही गावांचा संपर्क तुटला होता.पाणी पुलावरून प्रचंड वेगाने वहात असतांना सायंकाळी साडे सहाचे दरम्यान भेंडा खुर्द येथील सूर्यभान नागु मोहरकर (वय 65) व भाऊसाहेब राधुजी महापूर (वय 52) एकमेकांचे हात धरून हे पुराचे पाण्यातून ओढा ओलांडून भेंडा खुर्द कडे जात असताना पुराचे पाण्याने ओढ्यात ओढले जाऊन पाण्यात वाहून गेले.उपस्थितांनी आरडा ओरड करून मदतीला धावले.पुरात वाहून गेलेले सुर्यभान मोहरकर याने हाती लागले झाड घट्ट पकडून ठेवले.स्थानिक नागरिकांनी दोर टाकून त्यांना बाहेर काढले.तर बऱ्याच प्रयत्नांनंतर भाऊसाहेब राधुजी महापूर यांना देखील वाचवण्यात स्थानिकांना यश आले
     दरम्यान पुरात वाहून जाणारे हे दोघे जण बऱ्याच वेळा पासून ओढा ओलडण्याचे  प्रयत्न करीत होते त्यांनी अनेकांनी रोखण्याचा प्रयत्न केला परंतु त्यानी कोणाला ही जुमानता पुरात शिरले आणि वाहून  गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली.आताताई पणा त्यांच्या चांगलाच अंगलट आला होता.शेवटी काय तर काळ आला होता पण वेळ आली नाही असेच म्हणावे लागेल.