नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीपूर्वीच यूपीतील भाजपला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात असलेले ज्येष्ठ मंत्री स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. याबाबत अखिलेश यादव यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.
स्वामी प्रसाद मौर्य हे अगोदर २०१६मध्ये बहुजन समाज पक्षातून भाजपामध्ये गेले होते. आता त्यांनी पुन्हा घरवापसी केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कन्या संघमित्रा मौर्य या अजूनही भाजपाच्या खासदार आहेत. त्यांच्याविषयी अद्याप कोणताही निर्णय समोर आला नाहीये.
सामाजिक न्याय और समता-समानता की लड़ाई लड़ने वाले लोकप्रिय नेता श्री स्वामी प्रसाद मौर्या जी एवं उनके साथ आने वाले अन्य सभी नेताओं, कार्यकर्ताओं और समर्थकों का सपा में ससम्मान हार्दिक स्वागत एवं अभिनंदन!
सामाजिक न्याय का इंक़लाब होगा ~ बाइस में बदलाव होगा#बाइसमेंबाइसिकल pic.twitter.com/BPvSK3GEDQ
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) January 11, 2022
एक दोन नाही तर डझनभर आमदार राजीनामा देतील…
“सामाजिक न्याय आणि समता-सामनतेचा लढा देणारे स्वामी प्रसाद मौर्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं सपामध्ये स्वागत आहे. सामाजिक न्याय का इन्कलाब होगा, बाईस में बदलाव होगा” असे ट्वीट अखिलेश यादव यांनी केले आहे. दरम्यान भाजप सोडल्यानंतर स्वामी प्रसाद मौर्य यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेली पाच वर्ष मी यांची विचारसरणी पाहिली आहे. “मी आंबेडकर विचारसरणीचा आहे. आंबेडकर विचारसरणीच्या एका व्यक्तीला भाजपामध्ये ५ वर्ष काम करावं लागताना जे सहन करावं लागलं, त्या माझ्या वेदना आहेत.” असे ते म्हणाले आहेत. तसेच यावेळी त्यांनी एक दोन नाही तर डझनभर आमदार राजीनामा देतील असे वक्तव्यही केले आहे. याविषयी मी एक-दोन दिवसांमध्ये घोषणा करेन असेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का मानला जातो.
महत्वाच्या बातम्या
- मायावती विधानसभा निवडणूक लढणार नाहीत; बसपा खासदार सतीशचंद्र मिश्रा यांची माहिती
- मोदींच्या मातोश्री, इराणी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यास चोप देणाऱ्या महिलांचे भाजपने केले कौतुक
- “भाजपचे धोकादायक ‘टेक फॉग’ ॲप द्वेषाचे विष पेरते”, काँग्रेसने ‘तो’ व्हिडिओ पोस्ट करत साधला निशाणा
- ‘पूर्वी म्हणायचे देश धोक्यात, आता म्हणतात मोदी धोक्यात’; नाना पटोलेंचा टोला
- “पवार साहेबांची अॅलर्जी कोणाला असण्याचे कारण नाही”, पडळकरांना छगन भुजबळांचे प्रत्युत्तर
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<