भाजपला मोठा धक्का; नीट वागणूक दिली जात नाही म्हणत ‘या’ ज्येष्ठ नेत्याने दिला राजीनामा

भाजपला मोठा धक्का; नीट वागणूक दिली जात नाही म्हणत ‘या’ ज्येष्ठ नेत्याने दिला राजीनामा

Himachal Pradesh - BJP

शिमला: हिमाचल प्रदेशातील पोटनिवडणुकीत (Himachal Pradesh Election) दणकून पराभव झाल्यानंतर आता भाजपला (BJP) आणखी धक्के बसू लागले आहेत. मंडी लोकसभा मतदारसंगासह तीन विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पक्षाचा दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे राज्यात भाजपचा प्रभाव कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदारांची बैठक 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या बैठकीत पुढील धोरण निश्चित केले जाणार आहेत.

पोटनिवडणुकीतील पराभव तसेच नेत्यांमधील नाराजी वाढत चालल्याने मुख्यमंत्री जयराम ठाकूर (Jayram Thakur) यांच्यासमोरील अडचणी वाढल्याची चर्चा आहे. भाजप पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे दिसत आहे. त्याच सोबत आपल्याला व्यवस्थित वागणूक दिली जात नाही आणि आपल्याला गांभीर्याने घेतले जात नाही, अशा देखील तक्रारी ज्येष्ठ नेत्यांकडून येत असल्याचे बोलले जात आहे. याच कारणामुळे भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने थेट राजीनामा दिल्याची बातमी समोर आली आहे.

राज्यातील वरिष्ठ नेत्यांवर टीका करत प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार कृपालसिंग परमार (Kripal Sing Parmar) यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर बुधवारी सकाळी त्यांनी कार्यकारिणी सदस्यत्वाचाही तडकाफडकी राजीनामा दिला. राजीनामा देताना परमार यांनी प्रदेश नेत्यांकडून आपल्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी मांडलेल्या काही मुद्यांवर गांभीर्याने विचार केला जात नसल्याचाही त्यांचा दावा आहे. परमार हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J.P. Nadda) यांचे निकटवर्ती मानले जातात.

महत्वाच्या बातम्या: