‘आपली कुवत पाहून बोलावं’, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या नेत्याने पडळकरांना झापलं

padalkar

अहमदनगर : शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे असं पडळकर म्हणाले आहेत.

पुण्यात जोरदार पाऊस; तर उद्या कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

पडळकर यांची टीका राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले जेष्ठ नेते मधुकर पिचड यांनी रुचलेली दिसत नाही, त्यांनी यावर आपली जाहीर नारी व्यक्त केली आहे. ‘आपण भाजपमध्ये गेलो असलो, तरी शरद पवार यांना आपण जवळून पाहिले आहे. सर्वसामान्य, शेतकरी, कामगार, कष्टकरी वर्गाच्या सर्वांगीण विकासात त्यांचे योगदान नाकारून चालणार नाही. ते देशव्यापी नेतृत्व असून, (स्व.) यशवंतराव चव्हाण, (स्व.) वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांच्यानंतर शरद पवार यांचे नेतृत्व सर्व जातिधर्मांना, सर्वांना बरोबर घेऊन राजकारण, समाजकारण करणारे राहिले. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केलेली टीका माझ्या मनाला दुःख देणारी आहे. केवळ प्रसिद्धीसाठी भडक बोलणे, ही आता फॅशन’ बनली आहे. पवार हे देशव्यापी नेतृत्व आहे. त्यांच्यावरची टीका दुर्दैवी आहे.’ अस पिचड म्हणाले आहेत.

देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या नेतृत्वावर अतिशय छोट्या माणसाने टीका करणे योग्य नाही. हे निषेधार्थ आहे, असे सांगून पिचड म्हणाले, की मी राजकारणातून निवृत्त झालो असलो, तरी अशा घटनांनी मन व्यथित होते. गेल्या 40 वर्षांचा अनुभव आणि सध्या वय 80 आहे. त्यात आपण पवार यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले. अशा टीकांनी ते कधीच अस्थिर झाले नाहीत. मोठ्या माणसांबाबत बोलताना आपली कुवत पाहून बोलावे. अस देखील पिचड म्हणाले आहेत.

मोठी बातमी : टिक टॉक, युसी ब्राऊझर सह 59 चिनी अॅप्स वर बंदी; भारताचा चीनवर डिजिटल स्ट्राइक !