अभिनेते टॉम अल्टर यांचे निधन

३०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय

वेब टीम :हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांचे शुक्रवारी रात्री मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी अंगदुखीच्या त्रासामुळे त्यांना मुंबईतील सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना त्वचेचा कर्करोग झाल्याचे निदान केले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

Tom-Alter १

टॉम अल्टर यांनी वीर-झारा, भेजा फ्राय, विरुद्ध, अलग, बोस, यासारख्या तीनशेहून अधिक चित्रपटात लहान-मोठ्या भूमिका केल्या आहेत. जुनून, शक्तिमान, जबान संभालके यासारख्या टीव्ही मालिकांतील त्यांच्या व्यक्तिरेखाही गाजल्या आहेत. ‘दप्तर’ या मराठी चित्रपटातही अल्टर झळकले होते. त्यांनी काही चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं होतं.

80 च्या दशकात त्यांनी क्रीडा पत्रकारिता केली असून भारतासाठी पदार्पण करण्यापूर्वी सचिन तेंडुलकरची टीव्हीसाठी मुलाखत घेणारे ते पहिलेच मुलाखतकार ठरले होते. अल्टर यांनी तीन पुस्तकांचं लेखनही केलं. कला आणि चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी 2008 मध्ये टॉम अल्टर यांना पद्मश्री पुरस्कारानेही गौरवण्यात आलं होतं.

You might also like
Comments
Loading...